Homeopathy Clinic

संधीवात

सांधेदुखी आणि संधीवात आता फक्त वृद्धांच्या वाट्याला नाही राहीला. अनेक तरुण मंडळी पण सांधेदुखी ने खूप त्रस्त होतात.
ह्याच सगळ्यत महत्त्वाचं कारण म्हणजे – बदललेली जीवनशैली..
आणि बदललेला आहार..
दोन्ही गोष्टी थोडक्यात समजून घेऊया.
सांधेदुखी म्हणजे फक्त जॅाईंट पेन . म्हणजे इथे हाडं दुखत नाहीत किंवा क्वचित दुखतात पण. सांध्यांना (जॅाईंट्स ला ) सूज नसते.
आणि ब्लड रिपोर्ट केले तर त्या RA factor test निगेटिव्ह येते.
सांध्यांना व्यायाम नसल्याने
एकाजागी तासंतास बसून कामं केल्याने सांधेदुखी होते.
मात्र संधीवात जर बघाल तर ,, सांधे सूजतात,, कधीकधी हाताला गरम लागतातं,, आणि त्यांची हालचाल करताना प्रचंड वेदना होतात.
इथे ब्लड रिपोर्टRA factors test पॅासिटीव येते.

दोन्ही वर होमिओपॅथी मध्ये उत्तमं असे औषधोपचार उपलब्ध आहेत.

डायबेटिस मलायटीस

आज आपण भारतीय कशातच जगाच्या मागे नाही, मग डायबेटिस मलायटीस मधे कसे असणार ?!! हो!!
प्रत्येकाला सर्दी खोकला होतो तसा जवळपास सगळ्यांना काही मोजके लोकं सोडले तर सगळ्यांना च डायबेटिस डिटेक्ट होतोय. मग काय रोज ची गोळी मागे लावून घ्यायची , की झालं..तसं नाहीय एक प्रकारचा मॅान्स्टरच आहे हा.. तुमचा प्रत्येक अवयवावर ह्याची कुदृष्टी पडते. रोजची गोळी खाऊन तुम्ही ग्लुकोज लेवल मेनटेन करू शकता. पण काही त्या गोळ्यांचे आणि काही ह्या डायबेटिस चे साइड इफेक्ट्स शरीरावर दिसतात. थकवा येणे,वारंवार लघवीला जावे लागणे,वजन कमी होणे किंवा वाढणे पायाला मुंग्या येणे, दृष्टी अधू होणे एक न अनेक अशी लक्षण दिसतात.
मुळात आपल्या शरीरातील पॅनक्रियाज( सादुपिंड हा अवयव) जेव्हा इंशुलीन आपल्या आतड्यात सोडत नाही किंवा कमी सोडतो तेव्हा आपली ब्लड ग्लुकोज लेवल वाढते. कारण हे इंशुलीन च ह्या लेवल ला लेवल मधे ठेवत असते. मग ही लेवल वाढली तर काय?!! वाढूद्या की गोळी खाल्ली की कमी होईल!! तर नाही तुम्हाला तुमच्या कॅलरीज बर्न कराव्या लागतील.. नुसतं गोळी घेऊन भागणार नाही. इथे जास्त खोलात नाही सांगता येणार.. एवढं लक्षात ठेवू या की हे सगळं पुढे जाऊन हार्ट आणि ब्रेन वर इफेक्ट करतं. वेळीच सावध रहायला हवं.

आजकाल होमिओपॅथी मधे पन खूप छान आणि गुणकारी औषधं आहेत ज्यांच्या मदतीने ह्या डायबेटिस ला परास्तं करता येऊ शकतं.

हो हे खरं आहे!! लहान मुलांना कुठल्याही आजारांवर जर होमिओपॅथी ट्रिटमेंट दिली तर ह्या बऱ्या झालेल्या मुलांच वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण हे ॲलोपॅथीची औषध घेऊन बरी होणाऱ्या मुलांपेक्षा कमी असतं!!

म्हणजे लहान मुलांना सर्दी ,खोकला , ताप, डायरीया अशा आजारांसाठी जर होमिओपॅथी ट्रिटमेंट दिली तर ते वारंवार आजारी पडत नाहीत.
तसेच season change मुळे असे होणारे आजारामुळे त्यांना पुढच्या सिझन मधे कमी त्रास होतो, किंवा होतच नाही..

कारण त्यांची प्रतिकार शक्ती वाढलेली असते..

आणि आपण आपल्या क्लिनिक मधे
लहान मुलांना (वय ६ महिने ते १५ वर्ष) दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी
मुद्दाम हा होमिओपॅथी चा इम्युनीटी बुस्टर डोस देत असतो.

 

केस गळणे थांबविण्यासाठी आणि दाट लांब केस कोणाला नको असतात..

मुळात केस गळणे म्हणजे आपल्या आहारात ( जेवणात नाही ) काहीतरी कमतरता असणे, म्हणजे डायट( आहार) व्यवस्थीत नसणे, त्यात आवश्यक अशी पोषक तत्वे नसणे.

केसांच्या वाढीसाठी लागणारी पोषक तत्वे जर केसांच्या मुळांना मिळत नसतील तर वरून कांदा किंवा बाजारातलं महागडं तेल किंवा इतर बऱ्याच वस्तु लावून काही होणार नाही.

 

त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे

होमिओपॅथिक औषधोपचार…

किडनी स्टोन

आपल्या शरीरातील जास्तीचे किंवा ज्यांचे पचन नाही झाले असे मिनरल्स, सॅाल्ट्स ह्यांचे जेव्हा किडनीत क्रिस्टल्स बनतात, त्यांना आपण किडनी स्टोन म्हणतो..

किडनी स्टोन मुळे असह्य अशी पोटदुखी होते, उलटी , लघवीला जळजळ होणे ही सगळी लक्षणे दिसून येतात.

बरेचदा तुम्हाला ॲापरेशन चा सल्ला दिला जातो, सर्जरी करून स्टोन काढावा लागेल असं सांगितलं जातं..परंतु अत्यंत दुर्मिळ अशा केस मधे सर्जरी ची गरज भासते.
होमिओपॅथिक औषधोपचार पद्धतीने हि सगळी लक्षणे सुसह्य होतात , एवढं च नाही तर हे किडनी स्टोन पण सहज विरघळून जातात. आणि ते सुद्धा ॲापरेशन न करता..

ॲसिडिटी 
ॲसिड हा पाचक द्रव आहे जो पचन प्रक्रिया वाढवतो. पोट किंवा आतड्यांची आतली त्वचा गॅस्ट्रिक ॲसिडस्, किंवा गॅस्ट्रिक ज्यूस, यांसारखे विविध ॲसिडस् सिक्रीट करतात.

प्रथिनांसारख्या (प्रेटीन सारखा ) पचण्यास कठीण पोषक घटकांचे पचन करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या लहान युनिट्समध्ये मोडण्यासाठी या ॲसिडची आवश्यकता असते. त्याशुवाय प्रोटीनस् पचतच नाहीत.
ॲसिडिटी होते म्हणजे हे ॲसिड जास्त प्रमाणात तरी सिक्रिट होतात किंवा चुकीचा आहार अथवा चुकीच्या पद्धतीने आहार घेतल्यास त्रास देतात. म्हणजे जेवतांना खूप पाणी पिणे,जेवणात अती तेलकट पदार्थ असणे, अवेळी जेवणे असे अनेक कारणं असतात. छातीत जळजळ होणे, असह्य डोके दुखी असणे, मळमळ होणे, आंबट तिखट पाणी घशात येणे ही सगळी ॲसिडिटी ची लक्षणं आहेत.

त्यावर होमिओपॅथी मध्ये खूप गुणकारी औषधोपचार उपलब्ध आहे..

Testimonials

What Our Patients are Saying

Articles & Tips

Latest News & Blogs

Take the First Step Towards Better Health Today!

Call Now